सुनील शुक्रे राज्य मागासवर्ग आयोगाचे नवे अध्यक्ष; आयोग बरखास्त झाल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीने पुनर्रचना

काम करण्यासाठी दबाव असल्याचं सांगत मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्यासह अॅड. किल्लारीकर, हाके, मेश्राम यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता
सुनील शुक्रे राज्य मागासवर्ग आयोगाचे नवे अध्यक्ष; आयोग बरखास्त झाल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीने पुनर्रचना
Published on

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांपासून सदस्यांपर्यंत जवळपास सर्वच लोकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आता या आयोगाची पूनर्रचना करण्यात आली असून नव्या अध्यक्षांसह सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील शुक्रे यांच्यावर मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पूनर्रचना केलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे तर सदस्यपदी ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे आणि मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक-एक सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देत असताना न्या. अशोक निरगुडे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आयोगाची पूनर्रचना करण्यात आली आहे.

यापूर्वी तीन सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आयोगच बरखास्त झाला होता. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने आणि त्यासाठीचं काम करण्याची जबाबदारी या आयोगावर असल्याने राज्य सरकारने तातडीने या आयोगाची पुनर्रचना केली आहे.

माजी अध्यक्षांसह सदस्यांचा दबाव असल्याचं कारण देत राजीनामा

मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्यासह अॅड. किल्लारीकर, हाके, मेश्राम यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. काम करण्यासाठी आपल्यावर सरकारचा दबाव असल्याचं काही सदस्यांचं म्हणणं होतं. मात्र, नेमका कशा पद्धतीचा दबाव त्यांच्यावर होता, याबाबत त्यांनी काहीही त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं.

logo
marathi.freepressjournal.in