अधीक्षक अभियंत्यासह लिपिक लाच घेताना ताब्यात

अर्धा टक्काप्रमाणे सात लाख रुपयांची मागणी राजपूत यांनी केली. पैसे दिले तर मुख्य अभियंता यांच्याकडे शिफारस करतो, असे त्यांनी गुतेदाराला सांगितले.
अधीक्षक अभियंत्यासह लिपिक लाच घेताना ताब्यात

नांदेड : रस्त्याच्या कामाचे टेंडर मुख्य अभियंता यांच्याकडे शिफारस करण्यासाठी गुत्तेदराकदून सहा लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत, वरिष्ठ लिपिक विनोद केशवराव कंधारे यांच्याविरुध्द लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी राजपूत यांच्या घराची व कार्यालयाची झडती घेतली, तेव्हा रोख ७२ लाख ९१ हजार ४९० रुपये आढलले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यांत रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड (ता. हदगाव, जि. नांदेड) या रस्त्याच्या कामाचे टेंडर मंजूर झाले होते. सुमारे १४ कोटी रुपयांचे काम होते. कामांच्या निविदा स्वीकृती शिफारशीसाठी तक्रारदार हे राजपूत यांना भेटले असता, दोन टेंडरचे १४ कोटी १० लाख रुपये होतात. अर्धा टक्काप्रमाणे सात लाख रुपयांची मागणी राजपूत यांनी केली. पैसे दिले तर मुख्य अभियंता यांच्याकडे शिफारस करतो, असे त्यांनी गुतेदाराला सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे वरिष्ठ लिपीक विनोद कंधारे यांना भेटले असता, त्यांनी व त्यांच्यासोबतचे लिपिक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडरचे २५ हजार असे एकूण ५० हजार देण्याची मागणी केली. ही लाच असल्याचा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ आक्टोबर रोजी तक्रार दिली.

logo
marathi.freepressjournal.in