स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी? सुप्रीम कोर्टात आज निर्णय?

सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सदर याचिकेवरील सुनावणीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी? सुप्रीम कोर्टात आज निर्णय?
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सदर याचिकेवरील सुनावणीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्यावर कोरोनाचे संकट आल्याने राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांसह मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्यात आली नाही. दरम्यान, या सर्व महापालिकांमध्ये प्रशासकाद्वारे प्रशासनाचा कारभार हाकला जात आहे. याविरोधात डिसेंबर २०२१ मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल चार वर्षांनंतर न्या. सूर्य कांत आणि न्या. नाँगमेईकपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? यासंदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे. न्यायालयाच्या सुनावणीपूर्वीच मुंबई पालिका प्रशासन तयारीला लागल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी काही सरकारी कार्यालयांमध्ये विधानसभा निवडणुकीत ‘बीएलओ’ पदावर काम केलेल्या कर्मचाऱ्यांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामासाठी ‌रूजू होण्यास कळविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in