Supriya Sule : शाईफेक करणाऱ्या आरोपीवर कलम ३०७; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेक प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. (Supriya Sule)
Supriya Sule : शाईफेक करणाऱ्या आरोपीवर कलम ३०७; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप

पुण्यामध्ये भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काही तरुणांनी त्यांच्यावर शाई फेकत त्यांच्या विधानाचा निषेध दर्शवला. यासंदर्भात तिघांना अटक करण्यात आली असून त्यातील एकावर कलम ३०७ म्हणजेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका करताना, राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेचा मी निषेध करते. शाईफेक करणे या गोष्टीच समर्थन होऊ शकत नाही, मुळातच ही आपली संस्कृती नाही. पण, मला वाटत कायदा आता नियमानुसार चालत नाही. तर गृहमंत्र्यांच्या मर्जीनुसार चालतो. जो त्यांच्या विरोधात तोंड उघडतो, त्यांच्या मागे ईडी लावली जाते. विशेष म्हणजे, ईडीच्या ९५ टक्के केसेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये एखाद्या पक्षाचा नेता त्यांच्या पक्षात गेला की त्याला वॉशिंगमशीनमध्ये साफ केल्यासारखी क्लीन चीट दिली जाते, हे सारा देश पाहतो आहे. ही माहिती एका डेटावरून बाहेर आली आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in