Supriya Sule explanation : साडीवादावर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण; म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी साडी नेसण्यावर केलेल्या भाष्यानंतर आता सर्वांसमोर स्पष्टीकरण दिले आहे.
Supriya Sule explanation : साडीवादावर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण; म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका कार्यक्रमात 'चॅनेलमधील मुली साडी का नेसत नाहीत. त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात?' असा सवाल उपस्थित केला आणि टिकली वादानंतर साडीवादाची सुरुवात झाली. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले की, आधी माझे भाषण नीट ऐका. टे ३५ मिनिटांचे भाषण आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले की, "माझे भाषण नीट ऐका, एकूण ३५ मिनिटांचे भाषण होते. माझी विनंती आहे की, पूर्ण ऐकावे. माझा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. विरोधकांना माझ्यावर टीका करण्याचा पूर्व अधिकार आहे आणि तो ते उत्तमपणे बजावत आहेत. ते आमचे काही कौतुक करणार नाही. त्यांनी फार टीका केली त्या त्याबद्दल काही वाटत नाही. माझी आई नेहमी सांगते निंदकाचे घर हे शेजारी असावे, ते विरोधक काम पूर्ण करत आहे. आज तंत्रज्ञान आधुनिक झाले आहेत, पण त्याचा गैरवापरही होत आहे. जर ३५ मिनिटांचे भाषण हे १७ सेकंदाचे सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा." असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in