उद्योगविश्वातील 'दादागिरी'वरून टीकास्त्र; फडणवीसांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल

पुण्याच्या उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी शहराच्या विकासात बाधा ठरत असल्याचे वक्तव्य देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
उद्योगविश्वातील 'दादागिरी'वरून टीकास्त्र; फडणवीसांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल
Photo : X (@supriya_sule)
Published on

पुणे : पुण्याच्या उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी शहराच्या विकासात बाधा ठरत असल्याचे वक्तव्य देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ही दादागिरी कोणाची आहे? याला जबाबदार कोण ? पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार ? असा सवाल त्यांनी महायुती सरकारला विचारला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दादागिरीमुळे गुंतवणुकीवर परिणाम होत असल्याची कबुली दिली आहे, पण त्यावर कारवाई का केली नाही? हिंजवडीसारख्या औद्योगिक केंद्रात ६ लाख - रोजगार असूनही, सरकारच्या नाकर्तेपणामुळे नव्या - गुंतवणुकी राज्याबाहेर जात आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. "ही दादागिरी मोडीत काढण्यासाठी आम्ही साथ देऊ, पण सरकारने त्यासाठी ठोस पावले उचलावीत. पुण्याची सुसंस्कृत ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सरकारला सर्वतोपरी सहकार्य - करू," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

फडणवीसांनी नावे जाहीर करावीत - रोहित पवार

पुण्यातील तळेगाव, चाकण या परिसरातील आणि कंपन्या बाहेर जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर व्यासपीठावर दादागिरी असे म्हणत असतील तर तुम्ही काय करत आहात? असा प्रश्न निर्माण होतो. पुण्यातील एमआयडीसीमध्ये दादांची दादागिरी आहे का? अजितदादांच्या पक्षाची दादागिरी आहे की भाजपची की एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची आहे, हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे. फडणवीस यांनी कोण दादागिरी करतेय त्यांची नावे लवकरात लवकर जाहीर करावीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला आव्हान दिले.

logo
marathi.freepressjournal.in