Supriya Sule : महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय, म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला पदाधिकारी मेळावा वाय. बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहेत.
Supriya Sule : महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय, म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून पक्षाच्या नव्याने बांधणीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला पदाधिकारी मेळावा वाय. बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहेत. या मेळाव्याला सुरुवात होण्याआधी राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंसमोर रोष व्यक्त केला. राष्ट्रवादीचे कार्यक्रम दौरे ठरवताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारत घेतलं जात नसल्याची तक्रार महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंकडे केली. यावर सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे महिला अध्यक्षा माझ्या गाडीत बसलीत आणि माझ्या कार्यक्रमात प्रामुख्याने महिलांचा सहभाग असेल असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आगामी काळात दोन महत्वाच्या निवडणुका आहेत. पुढील १२ महिने आपल्यासाठी महत्वाचे असणार आहेत. राज्याची सद्याची परिस्थिती गंभीर आहे. एका काळ असा होता की दिल्लीला मुख्यमंत्री गेले की काहीतरी भूकंप होणार अशी चर्चा असायची. आत्ताचे मुख्यमंत्री दिल्लीत पालकमंत्री ठरवायला जातात. पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जायला वेळ होता . मात्र, नांदेडला जायला वेळ नव्हता. असा टोला देखील सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

पुणे मेट्रोला विरोध नाही, पण...

सुप्रिया सुळे यांनी पुणे मेट्रोवर आपली प्रतक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, माझा मेट्रोला विरोध नाही. परंतु मी पुण्यात आधी पीएमटी आणि एसटी महामंडळ चांगलं केलं असतं. मी पैसा तिथं घालवला असता आता नागपूर मेट्रो तोट्यात आहे. तिथं. मेट्रेत फॅशन शो वाढदिवस साजरे होतेत. पत्ते खेळले जातात. या सरकारच्या काळात शाळा बंद झाल्या आणि दारुचे दुकानं वाढले आहेत, असा बोचरी टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in