सुप्रिया सुळेंच्या मागे शिवसेना उभी- संजय राऊत

"अजित पवार भाषणात म्हणतात, माझं काम कर नाही, तर बघून घेईन. अरे तुम्ही काय बघणार...
सुप्रिया सुळेंच्या मागे शिवसेना उभी- संजय राऊत

प्रतिनिधी/मुंबई

तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही तुमची तुतारी चांगलीच वाजविणार आहोत. कोणीतरी एैरे-गैरे येणार आणि बारामतीत आमच्या पराभवासाठी ठाण मांडून बसणार. चंद्रकांत पाटील सांगणार की, त्यांना शरद पवार यांना संपवायचे आहे. आले किती गेले किती, बारामतीत शरद पवार यांचाच दरारा आहे. आमची शिवसेना ही सुप्रिया यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघावर आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष आता टिपेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूकडून प्रचाराचे रान उठविण्यात आले आहे. एका बाजूला शरद पवारविरुद्ध अजित पवार असाही संघर्ष आहे. दोन्ही बाजूकडील राज्यातील प्रमुख नेत्यांनी या मतदारसंघात प्रचाराला हजेरी लावली आहे. संजय राऊत यांनी देखील या मतदारसंघात सुप्रिया सुळेंसाठी प्रचारसभा घेत अजित पवार आणि भाजपवर टीकेची तोफ डागली आहे.

अजित पवार भाषणात म्हणतात, माझं काम कर नाही, तर बघून घेईन. अरे तुम्ही काय बघणार ४ जूननंतर जनताच तुम्हाला बघून घेणार आहे. धमक्या देउन निवडणूक लढवू नका. जनता तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना महाराष्ट्राची भिती वाटत आहे. गेली दहा वर्षे पंतप्रधान खोटं बोलत असल्याचे राऊत म्हणाले.

कोणी काही म्हटले, तरी आम्हाला फरक पडत नाही. बारामतीमध्ये आम्ही आमच्या शिवसेनेची संपूर्ण ताकद सुप्रिया सुळे यांच्यामागे उभी करत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in