दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलवादी सामान्य आदिवासींची हत्या करून भीती व दशहत पसरवण्याचे काम करीत असतानाच बुधवारी १२ लाखांचे बक्षीस असलेल्या माधुरी सुमन राजु मट्टामी (३४) व भामरागड एरिया टेक्निकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत सिताराम बक्का आत्राम (६३) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले. टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची ही यशस्वी कामगिरी मानली जात आहे.

आत्मसमर्पित नक्षलवादी रामसिंग उर्फ सिताराम बक्का आत्राम हा मार्च २००५ला अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत झाला. तीन महिने पेरमिलीमध्ये कार्यरत होता. मे २००५पासून तो माड डिव्हिजन टेक्निकल दलममध्ये कार्यरत होता. २००७ ते २०१२पर्यंत उप-कमांडर पदावर कार्यरत होता. २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरिया टेक्निकल दलममध्ये एसीएम पदावर पर्यंत कार्यरत होता. रामसिंगवर १ खून, १ चकमक व इतर १ असे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत. मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी चकमकीत तो सहभागी होता. माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजु मट्टामी ही नोव्हेंबर २००२ ला कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन डिसेंबर २०१२ पर्यंत कार्यरत होती. डिसेंबर २०१२ ते २०१३ पर्यंत ती भामरागड दलममध्ये कार्यरत होती. फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये ती एसीएम पदावर कार्यरत होती. माधुरीवर ४ खून, २१ चकमक, ७ जाळपोळ आणि इतर ५ असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in