पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन फाईल उघडणार; विरोधकांचा गोंधळ

विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये पुन्हा एकदा दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे तुफान गोंधळ
पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन फाईल उघडणार; विरोधकांचा गोंधळ

काल शिवसेना शिंदे गटाचे खासदार यांनी लोकसभेमध्ये, 'रिया चक्रवर्तीच्या फोनवर 'एयू' नावाने ४४ वेळा फोन आले होते. 'एयू' म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितले' असा गंभीर आरोप केला. यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असून या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. यामुळे आज दोन्ही सभागृन्हांमध्ये मोठा गोंधळ झाला आणि दोन्ही सभागृहाचे कामकाज हे अनेकदा तहकूब करण्यात आले.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे तपासणी सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल. ज्यांच्याकडे याचे कोणतेही पुरावे आहेत, त्यांनी ते आणून द्यावेत. दिशा सालियन प्रकरण कधीही सीबीआयकडे गेले नाही. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची तपासणी ही सीबीआयकडे गेली होती. नवीन पुरावे आले असतील, तर त्यांची चौकशी केली जाईल." यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ झाला आणि १० मिनिटांसाठी तहकूब झाले. पण यामुळे आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर, सभागृन पुन्हा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, "दिशा सालियन हयात नसताना त्याबद्दल आणखी चर्चा करून बदनाम करायचे नाही. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली होती, दिशाला बदनाम केले जात आहे, आम्हाला आता जगू द्या. ती आम्हाला सोडून गेली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी जर चौकशी कार्याची असेल तर पुजा चव्हाण आत्महत्येची देखील चौकशी करा. चौकशी करायची असेल तर सर्वच चौकशी करा, फक्त राजकारण करु नका." अशी मागणी केली आहे. यानंतर पुन्हा गोंधळ सुरु झाला आणि कामकाज तहकूब करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in