ललित पाटीलच्या अटकेनंतर सुषमा अंधारे आक्रमक ; दादा भुसेंनंतर घेतलं 'या' बड्या नेत्यांचं नाव

ललित पाटीलने केलेल्या दाव्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी दुसरं नाव घेतलं आहे.
ललित पाटीलच्या अटकेनंतर सुषमा अंधारे आक्रमक ; दादा भुसेंनंतर घेतलं 'या' बड्या नेत्यांचं नाव

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याने अनेक गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत. ससून रुग्णालयातून मी पळालो नसून मला पळवलं, असं म्हणत या प्रकरणात कोणा-कोणाचा हात आहे. हे सांगणार असल्याचं तो म्हणाला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसे यांचं नाव घेतलं होतं. ललित पाटीलने केलेल्या दाव्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी दुसरं नाव घेतलं आहे.

ललित पाटील याला पळवण्यास राजकीय नेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणात ललित पाटील याच्यासोबत दादा भूसे आणि शंभूराज देसाई यांची देखील नार्को टेस्ट करा. तसंच या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. इतकंच नाही तर ससून रुग्णालयाच्या डीनच्या डीनची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषणा अंधारे यांनी गंभीर आरोप केले होते. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसेंसोबत आणखी दोन मंत्र्यांचा समावेश असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी १३ ऑक्टोबर रोजी केला होता. या दोन मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू, असं देखील त्या म्हणाल्या होत्या. दादा भुसेंच कॉल रेकॉर्ड तपासा, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

आता ललित पाटील गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांनी दादा भुसे यांची चौकशी करा, तसंच पुण्याच्य ससूनचे डीन काळे, ससूनचे ऑनलाईन रेकॉर्ड चेक करा. तसंच ललित पाटील कोण आहे मला माहिती नाही असं भुसे सांगतात, पण ललित पाटील यांना मातोश्रीवर दादा भुसे घेऊन आले होते, हे खोटं आहे का? असा सवाल यांनी उपस्थित केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in