"फडणवीस अत्यंत शांतपणे खोटे बोलत आहेत", ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

त्याचा(ललित पाटीलचा) मातोश्रीवर फोटो असेल पण आमच्याकडे त्या जिल्ह्यातील मोठ्या नेत्यासोबत ललित पाटील मातोश्रीवर आला होता, असं देखील अंधारे म्हणाल्या.
"फडणवीस अत्यंत शांतपणे खोटे बोलत आहेत", ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. फडणवीस हे अत्यंत शांतपणे खोटे बोलत आहेत, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावेळी ललित पाटीलला का वाचवलं जात आहे? असा देखील सवाल अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस अत्यंत शांतपणे खोट बोलत आहेत. विधानपरिषदेच्या सभापती असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी आपल्या खुर्चीचा आदर राखत ललित पाटील बाबत माहिती देणं आवश्यक आहे, पण त्यांनी तसं केलं नाही. नीलम गोऱ्हे पुण्यात राहतात त्यांना माहिती नव्हतं का? धंगेकर यांना सभागृहात ललित पाटील विषयावर का बोलू दिलं नाही? जे त्यांना माहिती होतं, असा सवाल यावेळी अंधारे यांनी केला. फडणवीसांनी आमच्या पक्षाची चिंता करु नये, ललित पाटीलला का वाचवलं जात आहे? एका राज्याचे गृहमंत्री आहात त्या दृष्टीने कारवाई करा, असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.

हिवाळी अधिवेशनात लोकाभिमुख प्रश्न मांडले जातील असे वाटलं होते. पण सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रश्न गुंडाळले. ललित पाटील प्रकरणावर काय कारवाई झाली? यावर बोलताना फडणवीसांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. यामुळे मोठा नेक्सस बाहेर येईल असे म्हटले. पण, तसे झाले नाही. ते गोलमटोल उत्तर देत फक्त जागतिक अंमली पदार्थांव बोलले. नाशिकमध्ये गुन्हा केला त्याला कोण कोण मदत करत होते. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त होता? ललित पाटील कधीही आमच्या शिवसेनेत नव्हता, त्याचा मातोश्रीवर फोटो असेल पण आमच्याकडे त्या जिल्ह्यातील मोठ्या नेत्यासोबत ललित पाटील मातोश्रीवर आला होता. दादा भुसे यांनी त्याला मातोश्रीवर आणलं होतं, असं देखील त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in