पिंपरी-चिंचवडमधील दंड वसुलीस स्थगिती

चार वर्षांच्या विलंबाने ही दंड वसुली होत असून, या वसुलीच्या विरोधात जनतेत प्रचंड विरोध आहे
पिंपरी-चिंचवडमधील दंड वसुलीस स्थगिती
@samant_uday

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रति मालमत्ता ६९ रुपये प्रतिमहा उपयोगकर्ता शुल्क व दंड वसुली सुरू असून, हे बेकायदेशीर असल्याचा मुद्दा महेश लांडगे यांनी लक्षवेधीद्वारे मांडला. चार वर्षांच्या विलंबाने ही दंड वसुली होत असून, या वसुलीच्या विरोधात जनतेत प्रचंड विरोध आहे. त्यामुळे या वसुलीला स्थगिती देण्याची मागणी लांडगे यांनी केली. या लक्षवेधीला उत्तर देताना या दंड वसुलीबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल. तोपर्यंत वसुलीला स्थगिती देण्यात आली असल्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in