‘ताडोबा भवन’ पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र ठरणार ; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

"ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवे, असा विचार मनात आला. त्यामुळेच ४४८२ चौ. मीटर मध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल, तर...
‘ताडोबा भवन’ पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र ठरणार ; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूर : "ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवे, असा विचार मनात आला. त्यामुळेच ४४८२ चौ. मीटर मध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल, तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचे चालते-बोलते ज्ञानकेंद्र ठरणार आहे", असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर येथे ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन करताना वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. सुरवातीला इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन झाले असे घोषित करून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा भवन ही निर्जीव इमारत नसेल. तर पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ते एक चालतं-बोलतं विद्यापीठच राहील. देशाचे रक्षण करणा-या जवानांना आपण सॅल्यूट करतो, तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज सॅल्यूट करण्याची गरज आहे. देशाची सेवा सर्वतोपरी आहे, तशीच वसुंधरेची रक्षा रक्षा होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्टच असला पाहिजे. जगायचा आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो पर्यावरणातूनच मिळू शकतो. त्यामुळे ताडोबा भवन हे पर्यावरणाचा आनंद देणारे केंद्र राहील.

पुढे ते म्हणाले, ताडोबा भवन हे इको – फ्रेंडली असावे, या इमारतीमध्ये विजेचे बील येता कामा नये, त्यासाठी संपूर्ण इमारत सोलर पॅनलवर करावी. या इमारतीच्या बांधकामासाठी १८ कोटी ८ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, मात्र इतर अत्याधुनिक सोयीसुविधा करण्यासाठी अतिरिक्त १४ कोटी रुपये त्वरीत देण्यात येतील. वनविभागाच्या प्रस्तावांना गती देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

वन विभागात पायाभूत सुविधा उत्तम

वन विभागाच्या इमारती, विश्रामगृह अतिशय उत्तम करण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण राज्यातील वन कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीसुध्दा कॅम्पा मधून उत्तम करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

‘असे’ असेल ताडोबा भवन

चंद्रपूर येथील मुल रस्त्यावर असलेल्या क्षेत्र संचालक, ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खुल्या जागेत १८ कोटी ८ लाख खर्च करून नवीन ताडोबा भवन बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर १०० आसन क्षमतेचे ऑडिटोरियम, पहिल्या माळ्यावर उपवनरंक्षक (बफर) आणि उपवनसंरक्षक (कोअर) यांचे कार्यालय, तर दुसऱ्या माळ्यावर क्षेत्रीय संचालक यांचे कार्यालय राहणार आहे. याशिवाय संकीर्ण बांधकामामध्ये पेव्हींग ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in