हिम्मत ठेवा भाईजी, देव तुमच्या पाठीशी आहे;प्रफुल्ल पटेल यांच्या समर्थनार्थ झळकले बॅनर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात प्रफुल्ल पटेल यांना धीर देणारे पोस्टरसद्धा चर्चेचा विषय ठरले आहे
हिम्मत ठेवा भाईजी, देव तुमच्या पाठीशी आहे;प्रफुल्ल पटेल यांच्या समर्थनार्थ झळकले बॅनर

महाविकास आघाडी सरकार आता सत्तेवरून खाली आल्यानंतरही ईडीची पिडा नेत्यांच्या मागे कायम आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ईडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. पटेल यांच्या होमग्राऊंड असलेल्या भंडाऱ्यात कार्यकर्त्यांनी ‘हिम्मत ठेवा भाईजी, देव तुमच्या पाठीशी आहे’ बॅनर लावून धीर दिला आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात प्रफुल्ल पटेल यांना धीर देणारे पोस्टरसद्धा चर्चेचा विषय ठरले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीद्वारे कारवाई करण्यात आली असून, मुंबईतील त्यांच्या सीजे हाऊसमधील बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या सर्वांमुळे मात्र प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक चांगलेच दुखावले गेल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईने खचून जाऊ नये म्हणून त्यांना धीर देताना त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in