"२०१९पासूनच...", तानाजी सावंतांनी केला मोठा खुलासा; नेमकं काय म्हणाले?

२०१९मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणि त्यानंतर एकनाथ शिंदेसह ४० आमदारांच्या बंडखोरीबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला मोठा खुलासा
"२०१९पासूनच...", तानाजी सावंतांनी केला मोठा खुलासा; नेमकं काय म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप आणि इतर पक्षांचे नेते वारंवार गुपिते उघड करत आहेत. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनीही गौप्यस्फोट केला आहे. मी बंडखोरीसाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास दीडशे बैठका घेतल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून बंडखोरी सुरू झाल्याचा खुलासा तानाजी सावंत यांनी केला आहे. परंडा शहरात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सावंत बोलत होते.

राज्यातील सत्तातरासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या आहेत. या बंडखोरीसाठी मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील आमदारांचे समुपदेशन करत होतो. या सगळ्या गोष्टी मी सांगत होतो. काहीही झाकलेले नाही, असेही सावंत म्हणाले. सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

२०१९मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमचे सरकार बदलण्याचे काम सुरू झाले. आम्ही आमदाराचे समुपदेशन करत होतो. मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, "एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत १०० ते १५० बैठका झाल्या. त्यावेळी आमच्या तत्कालीन पक्षप्रमुखांनी मला मंत्रिमंडळातून बाजूला ठेवले. पण तानाजी सावंत म्हणाले की, मी जे सांगतो तेच तुम्ही आतापर्यंत बघितले असेल. ३० डिसेंबर २०१९ रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर ३ जानेवारी रोजी सुजितसिंह ठाकूर प्रथम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप जिल्हा परिषदेत पहिल्यांदा बंडखोरी झाली. त्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून झाल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले. तेव्हापासून मी बंडाचा झेंडा उभारला होता."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in