तनिषा भिसे मृत्यूप्रकरण : मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. घैसास यांचा राजीनामा

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मानद प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.
तनिषा भिसे मृत्यूप्रकरण : मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. घैसास यांचा राजीनामा
Published on

पुणे : तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मानद प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले की, आम्ही डिपॉझिट घेत नाही. मात्र त्या दिवशी गर्भवती महिलेकडे १० लाखांची डिपॉझिट मागितले होते.

डॉ. घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाला अधिकृतरित्या राजीनामा सुपूर्द केला असून या राजीनाम्याची माहिती समोर येताच वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. केळकर म्हणाले, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामापत्र

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवला आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ हा राजीनामा स्वीकारेल.

धर्मादाय रुग्णालय असताना नियम का पाळले नाहीत या प्रश्नाबाबत प्रसारमाध्यमांनी केलेल्या सरबत्तीनंतर धनंजय केळकर व इतर डॉक्टरांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

…म्हणून डॉ. घैसास यांचा राजीनामा

मला अनेक धमक्यांचे फोन येत आहेत. मी दडपणाखाली वावरत आहे. तसेच समाजमाध्यमांवर माझ्यावर कठोर टीकादेखील होत आहे. यामुळे तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे डॉ. घैसास यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. केळकर म्हणाले. यामध्ये कुटेही रुग्णालयाची बदनामी नको म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे घैसास यांनी सांगितल्याचे केळकर म्हणाले.

आमच्याकडे अर्जावर डिपॉझिट लिहायची पद्धत नाही, पण  आमच्याकडे अद्याप शासकीय अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतर त्यावर बोलणं योग्य होईल असे डॉ. केळकर म्हणाले. आमच्याकडे अर्जावर डिपॉझिट लिहायची पद्धत नाही. पण त्यादिवशी राहू-केतू काय झालं माहिती नाही, पण १० लाखांचं डिपॉझिट मागितल्याचे केळकर म्हणाले. पण असं कोणीही लिहीत नाही. मी दररोज १० शस्त्रक्रिया करतो. आजपर्यंत किती केल्या असतील पण मी कधीही असं डिपॉझिट मागितलं नसल्याचे डॉ. केळकर म्हणाले.

दीनानाथ रुग्णालयात डिपॉझिट घेण्याचे धोरण नाही. विशेषत: छोट्या रकमेसाठी कधीच नव्हते. पाच ते दहा लाख रुपयांसाठी ते धोरण होते. मात्र,    आपण गेल्या चार-पाच दिवसात ते मागे घेतले आहे. दुसरी गोष्टी म्हणजे आपला स्टाफ हा ओव्हर वर्क आहे, त्यामुळे वागण्यात जी एक संवेदनशीलता पाहिजे ती स्टाफमध्ये फार काम असल्याने कमी होते. ती सुधारणासाठीची प्रशिक्षण सुरु केले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आजचा हा शेवटचा राजीनामा आहे", असं डॉ. धनंजय केळकर म्हणाले.

मृत्यू नाही, हत्या - सुप्रिया सुळे

तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील डॉक्टरांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.   

रुग्णालयावर बेजबाबदारपणाचा अहवालात ठपका

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आणि पैशाच्या हव्यासामुळे तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचे राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या समितीच्या अहवालात समोर आले आहे. हा अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना सादर केला आहे. रुग्णालयाने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित असताना ते मिळाले नाहीत, असे अहवालात नमूद करतानाच रुग्णालयाने त्वरित उपचार केले असते तर रुग्णाचा प्राण वाचला असता, असे म्हटले आहे.   

logo
marathi.freepressjournal.in