झोपडपट्टीत टाटा वीज वितरणाचे जाळे विस्तारणार

टाटा पॉवरकडून मुंबईतील झोपडीवासियांना ग्राहकसेवा देण्यासाठी समर्पित विजेचे जाळे आखण्याची योजना जाहीर करणे अपेक्षित
झोपडपट्टीत टाटा वीज वितरणाचे जाळे विस्तारणार

वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरचे वीज वितरणाचे जाळे विस्तारले जात आहे. टाटा पॉवर कंपनीचे झोपडपट्टीत जाळे विस्तारल्याने त्याचा फायदा तेथील झोपडीधारकांना होणार आहे. निवासी दरात टाटा पॉवरची वीज स्वस्त असून झोपडपट्टीत वीज वितरणाचे जाळे विस्तारल्याने टाटा पॉवर कंपनीला ग्राहक मिळतील आणि झोपडपट्टी धारकांवर स्वस्तात वीज उपलब्ध होईल, असे टाटा पॉवर कंपनीकडून सांगण्यात आले.

टाटा पॉवरकडून मुंबईतील झोपडीवासियांना ग्राहकसेवा देण्यासाठी समर्पित विजेचे जाळे आखण्याची योजना जाहीर करणे अपेक्षित आहे. एलटी निवासी दर श्रेणींमध्ये टाटा पॉवरची वीज स्वस्त आहे. येथील ग्राहकांचा ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापर आहे. या भागात टाटा पॉवरचे विजेचे जाळे नसल्याने आजपर्यंत येथील ग्राहक स्वस्त विजेपासून वंचित राहिले. मात्र संबंधित क्षेत्रातील लोकसंख्येसाठी विजेच्या गरजा पूर्ण होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत विजेचे जाळे नसल्यामुळे टाटा पॉवरनेही या परिसरात सेवा दिलेली नाही. मात्र लवकरच झोपडपट्टीत विजेचे जाळे विस्तारले जात असून त्याचा झोफडपटवासियांना फायदा होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in