शीरखुर्मातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार? टीसीएस प्रकरणात तपास यंत्रणेकडे धक्कादायक माहिती

टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीत घडलेल्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींनी पीडित महिलांना शीरखुर्मा आणि काही थंड पेयांमध्ये गुंगीचे पदार्थ मिसळून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शीरखुर्मातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार? टीसीएस प्रकरणात तपास यंत्रणेकडे धक्कादायक माहिती
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नाशिक : टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीत घडलेल्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींनी पीडित महिलांना शीरखुर्मा आणि काही थंड पेयांमध्ये गुंगीचे पदार्थ मिसळून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मल्टिनॅशनल कंपनी प्रकरणातील संशयित आरोपींच्या एसआयटी चौकशीत आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कंपनीमध्ये पीडित तरुणी आणि महिलांना शीरखुर्मा खाण्यासाठी देऊन त्यांचे मनपरिवर्तन घडवून धर्मांतर करण्याचा आरोपींचा प्रयत्न सुरू होता. कंपनीमधील तरुणी आणि महिलांचे धर्मांतर षडयंत्र करून लैंगिक शोषण करण्यासाठी फंडिंग होत असल्याचे काही पुरावे एसआयटी पथकाला आढळल्याची माहिती आहे.

कंपनीतील दरम्यान, कर्मचाऱ्यांना धर्मांतर करण्यासाठी उद्युक्त केल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन एसआयटीला बाह्य फंडिंगचा संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. संशयितांनी वापरलेले लॅपटॉप, संगणकीय वेब हिस्ट्री आणि तत्सम साहित्य तपासण्यात येणार आहे. शिवाय संशयितांच्या बँक खात्यांचे विवरणपत्र तपासून त्यामध्ये बाह्य व्यवस्थेकडून काही फंडिंग झाले का? याची तपासणी करण्यात येणार आहे. न्यायालयाने चारही संशयितांच्या कोठडीत ५ मेपर्यंत वाढ केल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in