काॅर्पोरेट जिहाद प्रकरणाची TCS कडून चौकशी; नाशिकमधील प्रकार क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया

नाशिक येथील टीसीएसमधील आरोपांची टाटा सन्स अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दखल घेतली असून प्रकरणाची वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
काॅर्पोरेट जिहाद प्रकरणाची TCS कडून चौकशी; नाशिकमधील प्रकार क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया
काॅर्पोरेट जिहाद प्रकरणाची TCS कडून चौकशी; नाशिकमधील प्रकार क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया
Published on

मुंबई : नाशिक येथील टीसीएसमधील आरोपांची टाटा सन्स अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दखल घेतली असून प्रकरणाची वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

नाशिक शाखेतून समोर आलेल्या तक्रारी आणि आरोप अत्यंत चिंताजनक आणि क्लेशदायक असल्याचे चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी आणि दोषी व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले.

नाशिकमधील कार्यालयातील ८ महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतर केल्याचे आरोप केले आहेत. या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात असून आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. कंपनी सुरू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले. टाटा समूहाचे कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरण असल्याचे चंद्रशेखरन यांनी नमूद केले. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी तातडीने सुधारणात्मक पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले.

आयटी कंपन्यांचे ऑडिट करण्याची मागणी; 'पॅाश' कायद्याच्या तपासणीची विनंती

नवी दिल्ली : नाशिकमधील टीसीएस कार्यालयातील लैंगिक छळ, धर्मांतराच्या आरोपांनंतर आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या 'नाइट्स' संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

'नाइट्स'ने सोमवारी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे पत्र पाठवून 'टीसीएस'मधील 'पॅाश' (लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा) नियमांच्या पालनाचे सखोल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व बड्या बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये राज्यस्तरावर अशी तपासणी करण्याची विनंती केली आहे. 'नेसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट'ने (नाईट्स) कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांना लिहिलेल्या पत्रात 'टीसीएस'च्या सर्व आस्थापनांमधील अंतर्गत समित्यांची स्थापना आणि कामकाजाचे ऑडिट करण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in