
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक अशा एकूण ५ मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान आज पार पडत आहे. अशामध्ये नाशिक मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष लागले असून कोण बाजी मारणार याची सर्वानांच उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये पहिल्या २ तासांत ७ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक मतदार मतदानासाठी रांगा लावून उभे होते. तर, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी तब्बल २२ उमेदवार लढत आहेत. तर, गडचिरोलीमध्येही शिक्षक मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सकाळी पहिल्या २ तासांमध्ये तब्बल १२.८६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.