तंबाखू सोडण्यासाठी आता शिक्षक 'ब्रँड ॲम्बॅसेडर'; महाराष्ट्रात तब्बल 'इतके' लोक तंबाखूच्या समस्यांनी त्रस्त

महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत २७ टक्के लोक तंबाखू सेवनाने होणाऱ्या समस्यांनी त्रस्त आहेत. तर भारतात तंबाखूशी संबंधित आजारांमुळे मृत्यूचा दर हा दररोज ३७०० व्यक्ती इतका आहे.
तंबाखू सोडण्यासाठी आता शिक्षक 'ब्रँड ॲम्बॅसेडर'; महाराष्ट्रात तब्बल 'इतके' लोक तंबाखूच्या समस्यांनी त्रस्त

मुंबई : महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत २७ टक्के लोक तंबाखू सेवनाने होणाऱ्या समस्यांनी त्रस्त आहेत. तर भारतात तंबाखूशी संबंधित आजारांमुळे मृत्यूचा दर हा दररोज ३७०० व्यक्ती इतका आहे. या भयावह स्थितीचा सामना करण्यासाठी आता महाराष्ट्रातील शिक्षकांना तंबाखू सोडण्यासाठीचा ब्रँड ॲम्बॅसेडर करत 'तंबाखूमुक्त समाज' या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे या संबधित कार्यक्रमाची माहिती प्रेस क्लब येथे गुरुवारी हिलीस या आंतरराष्ट्रीय तंबाखूमुक्त समाज संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश गुप्ता यांनी दिली.

'तंबाखूमुक्त समाज' या जनजागृती कार्यक्रम अंतर्गत शाळांमध्ये तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न वाढवण्यासाठी शिक्षकांनाच महत्त्वपूर्ण प्रभावशाली व्यक्ति म्हणून सादर करण्यात येणार आहे. बिहारमध्ये या अगोदरच 'तंबाखूमुक्त समाज' कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार आहे ,असे डॉ. मंगेश पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

नवीन उपायांची गरज

तंबाखूमुळे केवळ मृत्यूच होत नाही, तर श्वसनाशी संबंधित समस्या, हृदयविकार आणि विविध प्रकारच्या कॅन्सर सारख्या आरोग्य समस्याही निर्माण होताना दिसत आहेत. सार्वजनिक आरोग्यावर होणारा हा घातक परिणाम पाहून नाविन्यपूर्ण उपायांची गरज असून, 'तंबाखूमुक्त समाज' कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, असे डॉ. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

तंबाखूच्या दुष्परिणामांची गडद छाया महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असून, २० टक्के जनतेला तंबाखू सेवनामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई बरोबरच पुण्यातील निसर्गरम्य परिसरात सुध्दा तंबाखूमुळे रोज होणाऱ्या मृत्यूची संख्या खूप मोठी आहे. - डॉ. मंगेश पेडणेकर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in