भीषण अपघातात शिक्षिका जागीच ठार; पती गंभीर जखमी

सातारा पंढरपूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवड, ता. माणनजीकच्या वाण्याची झाडी म्हणून असलेल्या ठिकाणी सोमवारी झालेल्या भीषण अपघातात आटपाडी तालुक्यातील शिक्षिका असलेली पत्नी जागीच ठार तर शिक्षक पती गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
File Photo
File Photo
Published on

कराड : जिल्ह्यातील सातारा पंढरपूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवड, ता. माणनजीकच्या वाण्याची झाडी म्हणून असलेल्या ठिकाणी सोमवारी झालेल्या भीषण अपघातात आटपाडी तालुक्यातील शिक्षिका असलेली पत्नी जागीच ठार तर शिक्षक पती गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र निवृत्ती देशमुख व त्यांच्या पत्नी जयश्री रामचंद्र देशमुख हे पुण्यावरून घरी परतत होते. घटनास्थळाजवळ आल्यावर रामचंद्र देशमुख यांना गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने गाडीने रस्ता सोडून संरक्षण कठड्याच्या पत्र्याला जोरदार धडक दिली. त्यावेळी तो पत्रा तुटून गाडीत घुसून जयश्री देशमुख यांच्या पोटात घुसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती रामचंद्र देशमुख हे देखील त्याच पत्र्याने गंभीर इजा केल्याने जखमी झाले.

logo
marathi.freepressjournal.in