
मुंबई : शाळेत अध्यापन करत असतानाच उच्च शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता सर्व्हिस बुकमध्ये नोंदवण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी शाळांना दिले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांना लाभ होणार आहे. याबाबतचे आदेश मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत.
शिक्षकांची अधिकची शैक्षणिक पात्रता नोंदविण्यात येत नसल्याची तक्रारी मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याकडे आल्या होत्या. याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन शिक्षकांची अधिकची शैक्षणिक पात्रता सर्व्हिस बुकमध्ये नोंद करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उच्च किंवा अधिकची प्राप्त शैक्षणिक अर्हता सेवा पुस्तिकेत नोंदविण्याबाबतचे आदेश शाळांना दिले आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उच्च किंवा अधिकची शैक्षणिक अर्हता प्राप्त करीत असतात.