घंटागाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू

महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर त्या वळण घेत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या घंटागाडीने त्यांच्या मोपेडला धडक दिली.
घंटागाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुली येथे पाठीमागून आलेल्या घंटागाडीने मोपेडला जोरदार धडक दिली. मोपेड चालवणाऱ्या प्राध्यापिका विनिता कुयटे या घंटागाडीच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा करूण अंत झाला. मयत महिला ही के. के. वाघ महाविद्यालयाची प्राध्यापिका असून, याप्रकरणी संशयित घंटागाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना शनिवारी (ता. २४) सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.प्रा. विनिता कुयटे या त्यांच्या मोपेडवरून सकाळी सरस्वती नगर परिसरात असलेल्या के. के. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाल्या. महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर त्या वळण घेत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या घंटागाडीने त्यांच्या मोपेडला धडक दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in