शिक्षकांना अध्यापनासाठी मिळणार अधिक वेळ; माहितीचा वार शनिवार निश्चित

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या अनुषंगाने सूचना करण्यात आल्या होत्या.
शिक्षकांना अध्यापनासाठी मिळणार अधिक वेळ; माहितीचा वार शनिवार निश्चित
शिक्षकांना अध्यापनासाठी मिळणार अधिक वेळ; माहितीचा वार शनिवार निश्चित'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या अनुषंगाने सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचना विचारात घेऊन शिक्षकांची शैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे व बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील नुसार महत्त्वाच्या कामांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने दर शनिवारी शालेय स्तरावरील माहिती सदर करण्याचा वार निश्चित केला आहे.

या निर्णयामुळे शिक्षकांचा अतिरिक्त कामाचा ताण कमी होऊन विद्यार्थीची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी वेळ मिळणार आहे. शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून ४ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये यू-डायस व सरल प्रणालीचे एकत्रीकरण करुन एकाच पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा दिली आहे.

शिक्षकांना अध्यापनासाठी मिळणार अधिक वेळ; माहितीचा वार शनिवार निश्चित
Thane : महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे शिक्षकांची वानवा; २२२ तासिका तत्त्वावरील शिक्षकाचा भार

याशिवाय पीएम पोषण योजनेमध्ये नोंदवहीतील नोंदीचे काम कमी होण्यासाठी पोर्टलवर सुविधा देऊन लातूर जिल्ह्यासाठी पथदर्शी अभ्यास करण्यात आला. अशा प्रकारे राज्यस्तरावरून शिक्षकांचा शैक्षणिक बाबीं संदर्भात माहिती सादर करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in