महाविकास आघाडीचा हल्लाबोल महामोर्चाचा टिझर प्रदर्शित; तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?

महाविकास आघाडीने व्हिडीओ प्रदर्शित करत भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान केल्याचा निषेध करत मुंबईत महामोर्चा काढणार आहेत.
महाविकास आघाडीचा हल्लाबोल महामोर्चाचा टिझर प्रदर्शित; तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?

महाविकास आघाडी मुंबईमध्ये १७ डिसेंबरला महामोर्चा काढणार असून यासंबंधित एक व्हिडीओ टिझर पण प्रदर्शित केला आहे. यामध्ये भाजपच्या ४ नेत्यांनी महापुरुषांचा अवमान केल्याची टीका केली आहे.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, महापुरुषांचा अपमान तसेच बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवर हा महामोर्चा आयोजित केला असल्याचे सांगितले होते.

महाविकास आघाडीच्या टीझरमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजप नेते प्रसाद लाड यांची विधाने दाखवण्यात आली आहेत. तसेच महापुरुषांचा अवमान सहन का करायचा? असा सवालही टीझरमधून उपस्थित करण्यात आला. तसेच, अद्याप या मोर्चासाठी परवानगी देण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे, आशिष शेलार यांनी भाजपसुद्धा माफी मांगो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in