मुंबईसह अनेक ठिकाणी तापमानात वाढ ; नागरिकांना काळजी करण्याचे आवाहन

मंगळवारी 29 हजार 116 मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली. एकट्या मुंबईची विजेची मागणी ३ हजार ६७८ मेगावॅटवर पोहोचली
मुंबईसह अनेक ठिकाणी तापमानात वाढ ; नागरिकांना काळजी करण्याचे आवाहन

उन्हामुळे राज्यात तापमानात प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे. देशात सातत्याने हवामान बदल होत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे, काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहरांमध्ये तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. देशाच्या पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानाने चाळीशी ओलांडल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त असून दुपारी रस्ते रिकामे झाले आहेत. सर्वत्र एसी, पंखे, कुलरचा वापर वाढला आहे, त्यामुळेच विजेची मागणीही वाढली आहे. 

काल म्हणजेच मंगळवारी 29 हजार 116 मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली. एकट्या मुंबईची विजेची मागणी ३ हजार ६७८ मेगावॅटवर पोहोचली आहे. महावितरणच्या ग्राहकांची आतापर्यंतची सर्वाधिक वीज मागणी एप्रिल 2022 मध्ये 24 हजार 996 मेगावॅट इतकी नोंदवली गेली. गेल्या आठवड्यात २५ हजार १०० मेगा वॅट वीज मागणीच्या तुलनेत हा आकडा आता मागे आहे. राज्यभरातील उष्णतेची लाट पाहता मंगळवार, 18 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या दरम्यान महावितरणच्या विजेच्या मागणीने 25 हजार 437 मेगावॅटची विक्रमी पातळी गाठली  

दरम्यान दुपारी घराबाहेर पडणे टाळा. शक्य तितके पाणी प्या. उन्हाळ्यात शरीराचे तापमान सतत वाढत राहिल्यास, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा नैराश्य जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in