दहा ते पंधरा आमदार निवडून आणणार ; आ.बच्चू कडू यांची घोषणा

माझी युती ही फक्त जनतेशीच, असं देखील बच्चू कडू यावेळी म्हणाले.
दहा ते पंधरा आमदार निवडून आणणार ; आ.बच्चू कडू यांची घोषणा

कराड : आगामी विधानसभा निवडणुकीत पंधरा ठिकाणच्या विधानसभा मतदार संघात 'प्रहार' आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत ते सर्व पंधरा आमदार निवडून आणणार आहे. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रहार संघटना मोठ्या ताकदीने म्हणजे १२० टक्के लढविणारच आहे. माझी युती ही फक्त जनतेशीच आहे.त्यामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात तेथील भाजप आम.जयकुमार गोरे यांना माझे आव्हान राहणार आहे, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.

सातारा येथे दिव्यांग आपल्या दारी अभियानासाठी दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा प्रहार संघटनेचे बच्चू कडू आले असता आ.बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी उपस्थित प्रश्नांवर ते बोलत होते.

कडू म्हणाले,सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांशी आमची बांधिलकी आहे.त्यांचे प्रश्न सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य आहे.त्यामुळेच साताऱ्यात अतिशय चांगल्या पध्दतीने दिव्यांगाचा कॅम्प आयोजित केला आहे.पण इथल्या सिव्हील सर्जनच्या खूप तक्रारी असल्या तरी जिल्हाधिकाऱ्यांचे काम चांगले आहे.शासनाचे काही शासन निर्णय बदलणे गरजेचे आहे.दिव्यांगांच्या बाबतीत काही निर्णय बदलणे गरजेचे आहे.त्याशिवाय दिव्यांग बांधवांना लाभ मिळणार नाही. या अभियानात सातारा जिल्हा राज्यात आदर्श ठरेल अशी अपेक्षा आहे. यासाठी मी दोन महिन्यातून एकदा येथे येणार आहे.आता दिव्यांगांच्या अडचणीचे काय धोरण आहे ते ठरवून त्यासाठी चांगल्या निर्णयाचे तोरण बांधणार आहे.यापुढे दिव्यांगाकडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकीत याचे उत्तर संबंधितांना मिळणार आहे. कारण, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दिव्यांगाची संख्या मोठी आहे.

logo
marathi.freepressjournal.in