
विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे सध्या गुन्हेगारीचं केंद्र बिंदू बनत चाललं आहे. पुण्यात कोयदा गँग ला आवर घालण्यास पुणे पोलीस अपयशी ठरत आहेत. पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करुनही कोयदा गँगची दहशत काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाही. कोयदा गँगकडून वारंवर गुन्हेगारी कृत्ये केली जात आहेत. अशात कोयता गँगकडून एका १७ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सोमवारी पुण्यातील हडपसरमधील मिरेकर वस्तीत जुन्या वातातून कोयता घेऊन आलेल्या तरुणांच्या टोळीने एका १७ वर्षीच मुलाची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली. मिरेकर वस्तीतील शंकर मठातील स्वप्नील झोंबार्डे हा आपल्या आईसोबत कात्रज परिसरातील दुसऱ्या घरात राहायला गेला होता. तो जुन्या घरोचे वीज बील भरण्यासाठी आला असता कोयता टोळीने त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी सनी रावसाहेब कांबळे (२५), अमन साजिद शेख (२२), आकाश हनुमंत कांबळे (२३) यांना अटक केली. तसंच आणखी तीन अल्पवयीन मुलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलाचे वडील विठ्टळ महादेव ढोंबर्डे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहिनुसार, मृत तरुण आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. स्वप्नील आणि आरोपींमध्ये कोणत्यातही मुद्यावरुन वाद होता. स्वप्नील चार महिन्यापूर्वी त्याच्या नव्या घरात गेला. या तरुणांनी स्वप्नीला पाहिलं आणि त्याच्या घरात बोलावलं. यावेळी सर्वाींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्यावर तो जागीच ठार झाला. ही संपूर्ण घटना जुन्या वादातून घडली असून आम्ही भारतीय दंड न्यायालयाच्या कलम ३०२ आणि ३४ अंतर्गत आरोपींना अटक केली असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शिर्के यांनी मिररशी बोलताना सांगितलं.