सोलापूर : येथील टेक्स्टाइल कारखान्याला बुधवारी लागलेल्या आगीत ३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
सोलापूरमधील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये रूपम टेक्स्टाइल या टॉवेलच्या कारखान्यात कामगारांच्या खोलीत स्वयंपाक करताना बुधवारी सकाळी गॅस गळती झाली आणि त्यातून ही आग लागली. कारखान्यात तयार केलेल टॉवेल आणि खोक्यांचा साठा आगीत वेगाने पेटला. त्यात मनोज देहुरी, आनंद बगदी आणि सोहादेव बगदी या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तिघेही कामगार बिहारमधील होते. अन्य चार कामगार वेळीच बाहेर पडल्याने बचावले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली.