ठाकरे गटाने नार्वेकरांना दाखवले काळे झेंडे; संभाजीनगरमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवत नार्वेकरांचा निषेध केला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गट आमनेसामने आले.
ठाकरे गटाने नार्वेकरांना दाखवले काळे झेंडे; संभाजीनगरमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर ठाकरे गटात नार्वेकरांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवत नार्वेकरांचा निषेध केला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गट आमनेसामने आले.

शिवसेना ही शिंदेंचीच, असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने आक्रोश मोर्चाला सुरुवात केली. आम्ही सदैव उद्धव ठाकरे यांच्यासोबत असा बॅनर घेऊन कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा निषेध व्यक्त केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला. मुंबईत शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून राहुल नार्वेकर यांचा निषेध व्यक्त केला. नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेता राहुल नार्वेकर यांच्या घरोसमोर अतिरीक्त पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in