"पक्षाशी का केली गद्दारी?" ; धैर्यशील मानेंचा ताफा अडवून केली विचारणा

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटात गेलेल्या खासदार धैर्यशील माने यांनी ठाकरे गटाच्या सर्मथकांनी घेरले आणि विचारला जाब
"पक्षाशी का केली गद्दारी?" ; धैर्यशील मानेंचा ताफा अडवून केली विचारणा

शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने हे एका कार्यक्रमाला जात असताना काही ठाकरे गटाच्या सर्मथकांनी त्यांना अडवले. ‘शिवसेनेशी गद्दारी का केली?’ असा जाब यावेळी ठाकरे गटाच्या समर्थकांनी खासदार धैर्यशील मानेंना विचारला. यावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करून त्यांना दूर केले. मात्र, याचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला.

कोल्हापूरमधील हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे आज सकाळी चंदूर इथे कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि 'शिवसेनेची गद्दारी का केली? ६ महिन्यांसाठी शिवसेनेत येऊन तुम्ही हेरगिरी केली का?' असा जाब त्यांनी विचारला. यावेळी खासदार धैर्यशील मानेंनी गाडीबाहेर येऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही ठाकरे गटाच्या सर्मथकांनी, '५० खोके एकदम ओके', 'गद्दार माने' अशा घोषणा देण्यात सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र, पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर खासदार माने हे पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. यापूर्वीची अनेकदा ठाकरे गटाच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या नेत्यांना असे अडवत जाब विचारण्याचा प्रकार घडला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in