विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने रणशिंग फुंकले; जुलै महिन्यापासून राज्यभर सभांचा धडाका

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला घरघर लागली होती. पण लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर आता पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील नेतेमंडळी विधानसभेच्या कामाला लागली आहे.
विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने रणशिंग फुंकले; जुलै महिन्यापासून राज्यभर सभांचा धडाका

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला घरघर लागली होती. पण लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर आता पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील नेतेमंडळी विधानसभेच्या कामाला लागली आहे. लोकसभेप्रमाणे राज्यात चांगले यश मिळवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आता रणशिंग फुंकले असून राज्यभर दौरे करण्याचा प्लान उद्धव ठाकरेंनी आखला आहे. त्यामुळे जुलैपासूनच ठाकरेंच्या सभांचा धडाका लागणार आहे.

ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारला बऱ्यापैकी मात देत ३० जागा पटकावल्या. महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावे लागले. ठाकरेंच्या शिवसेनेने २२ जागांवर उमेदवार देत ९ खासदार लोकसभेत पाठवले. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या शिवसेनेने आता विधानसभा निवडणुकीची आतापासूनच जय्यत तयारी करायला सुरुवात केली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ जुलैपासून राज्यभर दौरा करणार आहेत. निष्ठावान शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा जोश भरण्यासाठी ‘शिवसंकल्प’ मेळाव्याचे आयोजन करण्यात केले आहे. राज्यभर पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मेळावे घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यापासून या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होत आहे.

एकीकडे विधानसभा निवडणुकीची महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष तयारी करत आहेत. राज्यात शिवसेनेची ताकद ज्या ठिकाणी आहे, तिथे उद्धव ठाकरे आगामी दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in