Dombivli : 'तुझा आवाज ऐकायचा होता' ; रुसलेल्या पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या

पती-पत्नीमध्ये किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर पत्नी दिवा येथे बहिणीकडे राहण्यासाठी निघून गेली.
Dombivli : 'तुझा आवाज ऐकायचा होता' ; रुसलेल्या पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या
Published on

ठाण्याच्या डोबिंवलीमध्ये एका ४१ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला फोन करून तिचा आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर काही मिनिटांतच त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीचे रहिवासी सुधाकर यादव आणि त्यांची पत्नी संजना यादव (३१) यांच्यात १९ डिसेंबर रोजी किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर पत्नी दिवा येथे बहिणीकडे राहण्यासाठी निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी 10 च्या सुमारास सुधाकर यांनी संजनाला फोन केला. त्यावेळी संजना कुर्ला येथे कामावर जाण्यास निघाल्या होत्या. फक्त दोन मिनिटांसाठी तुझा आवाज ऐकायचा असल्याचे ते फोनवर म्हणाले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर सुधाकरचा गळफास घेतानाचा फोटो मिळाला, असे संजनाने पोलिसांना सांगितले.

संजनाने तातडीने तिच्या शेजाऱ्यांना आपल्या घरी जाऊन पतीची विचारपूस करण्याची विनंती केली. शेजाऱ्याने दरवाजा ठोठावला पण प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला असता सुधाकर छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला.

डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in