ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांमध्ये शहापुरात वाढ

शहापूर तालुक्यामध्ये असलेल्या गावांतील फार्म हाऊसमधील विहिरींना नळपाणी योजनांच्या पाणीपुरवठ्यासाठी बसवलेले ट्रान्सफॉर्मर चालू लाईनमध्ये चोरून नेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.
ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांमध्ये शहापुरात वाढ
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

शहापूर : शहापूर तालुक्यामध्ये असलेल्या गावांतील फार्म हाऊसमधील विहिरींना नळपाणी योजनांच्या पाणीपुरवठ्यासाठी बसवलेले ट्रान्सफॉर्मर चालू लाईनमध्ये चोरून नेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करूनही एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नाही. तालुक्यातील बिरवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरवर चोरट्यांना चोरून नेता आला नाही, मात्र तो तोडून बाजूला फेकून देण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत.

संदर्भात एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की पोलिसांत तक्रार देऊन उपयोग काय अनेक वेळा तक्रार देऊनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येत आहे.

बिरवाडी, भातसानगर, कुकांबे, साजिवली, भातसा धरण परिसर व या परिसरातील फार्म हाऊस, विहिरी, नळपाणी योजनांसाठी बसविण्यात येणाऱ्या ट्रान्सफॉर्मर चालू वीजवाहिन्या तोडून चोरून नेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. काल रात्री तिसऱ्यांदा बिरवाडी पाणी योजनेच्या टाकीवर बसवण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर चोरून नेण्याचा धाडसी प्रयत्न करण्यात आला.

मात्र या ट्रान्सफॉर्मरला सर्वत्र वेल्डिंग केली असल्यामुळे चोरट्यांना तो तोडून नेण्यात यश आले नसले तरी तो तोडून टाकून खाली फेकून देण्यात आला आहे. यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in