गेल्या अडीच वर्षात तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, असे का म्हणाले उद्धव ठाकरे ?

माझ्यामुळे कोणाचा अपमान झाला असेल किंवा दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले
गेल्या अडीच वर्षात तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, असे का म्हणाले उद्धव ठाकरे ?

राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. मला माझ्याच लोकांनी धोका दिल्याने ही वेळ आली असेही ते म्हणाले.  मंत्रिमंडळ बैठकीच्या शेवटी मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही पुढील मंत्रिमंडळात मंत्र्यांचे उरलेले मुद्दे मांडू. गेल्या अडीच वर्षात तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद... माझ्यामुळे कोणाचा अपमान झाला असेल किंवा दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. २४ तासांत राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in