तेच खरे राज ठाकरे होते. पण आता ते वेगळ्या दिशेने - बाळासाहेब थोरात

गेल्या २४ तासांत भाजपचे तीन बडे नेते राज ठाकरेंना भेटले. त्यामुळे भाजपसोबत युतीचे काही संकेत आहेत,” बाळासाहेब थोरात म्हणाले.
तेच खरे राज ठाकरे होते. पण आता ते वेगळ्या दिशेने - बाळासाहेब थोरात
ANI
Published on

काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, "आम्ही 'लाव रे तो व्हिडिओ' मध्ये पाहिलेले राज ठाकरे हे खरे राज ठाकरे होते. पण आता ते वेगळ्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत," बाळासाहेब थोरात म्हणाले. ते बुधवारी (३१ ऑगस्ट) नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "आम्ही राज ठाकरेंची प्रगती पाहत आलो आहोत. यापूर्वी 'लाव रे तो व्हिडिओ'मध्ये ज्या राज ठाकरेंना आपण पाहिले तेच खरे राज ठाकरे होते. पण आता ते वेगळ्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत." गेल्या २४ तासांत भाजपचे तीन बडे नेते राज ठाकरेंना भेटले. त्यामुळे भाजपसोबत युतीचे काही संकेत आहेत,” बाळासाहेब थोरात म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in