१२वी भारतीय छात्र संसद पुण्यात १५ सप्टेंबरपासून सुरु

मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे
१२वी भारतीय छात्र संसद पुण्यात १५ सप्टेंबरपासून सुरु

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे बारावे वर्ष आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे.

तीन दिवस चालण या छात्र संसदेत भारत सरकारच्या कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, पर्यावरणवादी, हरित कार्यकर्ता आणि हिमालयन पर्यावरण अभ्यासक आणि संवर्धन संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती, प्रसिद्ध अभिनेत्री व राज्यसभेच्या माजी खासदार रूपा गांगुली, सीबीआयचे माजी संचालक, डी. आर. कार्तिकेयन, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता व राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा, प्रख्यात पत्रकार, राजकीय भाष्यकार, रशीद किडवाई, राज्यसभेचे खासदार संजय सिंह, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भारत सरकारचे राज्य अर्थ मंत्री डॉ. भागवत किशनराव कराड, लोकसभेचे खासदार मनीष तिवारी, लॅलनटॅपचे संपादक सौरभ द्विवेदी, राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, स्तंभकार एवं लेखक विक्रम संपत, प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन, पत्रकार, लेखक परंजॉय गुहा ठाकुर्ता, भाजपाची राष्ट्रीय प्रवक्ता भारती घोष यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर तीन दिवस चालणार्‍या या १२व्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in