विजया दशमीच्या मुहूर्तावर 'कृष्णा' च्या ६४ व्या गळीत हंगामाचा होणार शुभारंभ

या समारंभात कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत
विजया दशमीच्या मुहूर्तावर 'कृष्णा' च्या ६४ व्या गळीत हंगामाचा होणार शुभारंभ

कराड : येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी, २४ रोजी करण्यात येणार आहे. नवी दिल्ली येथील दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष संजय अवस्थी यांच्या हस्ते, आय एस जी इ सीचे उपाध्यक्ष विकास गांधी, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी उत्तरा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी गळीत हंगाम शुभारंभ होणार आहे.

या समारंभात कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कार्यक्रमाला सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, व्यापारी व हितचिंतक या सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in