"....याची कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी"; शिंदेंच्या भेटीवर विधानसभा अध्यक्षांनी मौन सोडले

राज्याशी निगडीत इतर प्रश्नासंदर्भातील राज्यातील कार्यकारी मंडळातील मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्याची मला गरज असेल तर मला कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
"....याची कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी"; शिंदेंच्या भेटीवर विधानसभा अध्यक्षांनी मौन सोडले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या(10 जानेवारी) शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेवर निकाल देण्याची शक्यता आहे. त्याआधी नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. ठाकरे गटानेही या भेटीवरुन सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. आता नार्वेकरांनी या भेटीबाबत माहिती दिली आहे. "अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांना कोणत्या कारणास्तव भेटू शकतात, काय-काय कारणे असू शकतात याची कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी, तरीही ते असे अरोप करत असतील तर त्यामागचा हेतू काय हे स्पष्ट होतेय", असे नार्वेकरांनी म्हटले आहे.

इतर कामे करु नये असा कोणताही आदेश नाही-

विधानसभा अध्यक्ष अपात्रतेची याचिका निकाली काढत असताना त्यांनी इतर कामे करू नयेत असा कोणताही आदेश नाही. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामे असतात. त्यात मुख्यमंत्रीही सदस्य असतात. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवणे माझे कर्तव्य आहे. राज्याशी निगडीत इतर प्रश्नासंदर्भातील राज्यातील कार्यकारी मंडळातील मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्याची मला गरज असेल तर मला कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

आजारी असल्याने भेट रखडली-

मुख्यमंत्र्यांसोबत माझी ३ जानेवारी रोजी बैठक ठरली होती. मी तेव्हा आजारी असल्याने मला तीन-चार दिवस घरातून बाहेर पडता आले नाही. माझी प्रकृती सावल्यानंतर रविवारी मतदारसंघातील काही महत्वाचे प्रश्न, विधिमंडळातील काही प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी तातडीने चर्चा करणे गरजेचे असल्याने मी त्यांची भेट घेतली, असे नार्वेकरांनी सांगितले.

दबाव आण्याचा प्रयत्न-

मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावर, 1986 च्या नियमांच्या आधारावर, विधिंडळाचे पायंडे, प्रथा परंपरांचा विचार करुन अत्यंत कायदेशीर निर्णय घेऊन जनतेला न्याय देणार आहे. हे आरोप बिनबुडाचे असून निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर दबाव आणि प्रभाव टाकण्यासाठी हे आरोप केले जात आहे, असेही नार्वेकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in