प्रतिक्षा संपणार! दहावी-बारावीच्या निकालाबाबत बोर्डाने दिले महत्वाचे संकेत

येत्या 31 मे दरम्यान बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्रतिक्षा संपणार! दहावी-बारावीच्या निकालाबाबत बोर्डाने दिले महत्वाचे संकेत
Published on

आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाचे दहावी-बारावी बोर्डाचे निकाल जाहीर झाले असून आता विद्यार्थ्यांसह पालकांना महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रूवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. आता या परिक्षांच्या निकालाची आतुरतेने वाट बघितली जात आहे. आता विद्यार्थी आणि पालकांची निकालाबाबतची प्रतिक्षा संपणार असून बोर्डाने निकाल कधी लागणार याचे संकते दिले आहेत.

बोर्डाकडून दहावी-बारावीच्या निकालाची तयारी सरु करण्यात आली आहे. येत्या 31 मे दरम्यान बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. महाराष्ट्रातून दहावीच्या परिक्षेला 15,77,256 विद्यार्थी बसले होते. त्यात 7,33,067 मुली तर 8,44,116 मुलांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 5,033 सेंटरवर दहावीची परिक्षा घेण्यात आली होती.

दहावी-बारावीचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.mahahhscboard.in

logo
marathi.freepressjournal.in