सावरकर यांनी शिक्षा भोगलेल्या इमारतीला प्रेरणा स्थान बनविणार; देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भूमिपूजन

रत्नागिरी कारागृहामध्ये दोन वर्ष शिक्षा भोगलेल्या सावरकरांना ज्या खोलीत ठेवण्यात आले होते, त्या खोलीचे अद्यावत योग्यतेचे सुशोभीकरण शासन करणार
सावरकर यांनी शिक्षा भोगलेल्या इमारतीला प्रेरणा स्थान बनविणार; देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी कारागृहामध्ये दोन वर्ष शिक्षा भोगलेल्या सावरकरांना ज्या खोलीत ठेवण्यात आले होते, त्या खोलीचे अद्यावत योग्यतेचे सुशोभीकरण शासन करणार असल्याचे व रत्नागिरी कारागृहाचे मजबुतीकरण करून त्याचे रूपडे बदलण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी कारागृहाला भेट दिल्यानंतर सांगितले. त्यांच्याहस्ते वि. दा.सावरकर कोठडी खोलीच्या नूतनीकरण कामाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावर आठ कोटी चोवीस लाख रुपयांच्या विशेष निधीतून हे काम होणार आहे. तसेच अनेक पर्यटक या कारागृहाला भेट देत असतात तसेच ते एक सर्वांचे प्रेरणा स्थान असल्याने याकडे विशेष लक्ष घातल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तिढा सुटला आहे, आता या मतदार संघात महायुतीचा उमेदवार लोकसभा लढवणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर करून भाजप या मतदारसंघात उमेदवार देणार या विषयाला बगल दिली. शिंदे गट शिवसेनेला ही जागा सोडण्यात यावी येथील खासदार शिवसेनेचा असल्याने पालक मंत्री उदय सामंत यांनी उमेदवारीबाबत हट्ट धरला आहे. त्यांचे भाऊ किरण सामंत याना उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला असल्याने साधारण शिंदे गटाची ही मागणी कदाचित मान्य होईल, मात्र या मतदार संघात चिन्हाची अदला बदल होणे शक्य होईल अशी भाजप वर्तुळातून दबक्या आवाजात चर्चा होती. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार उभा राहणार असल्याचे सांगत पत्रकारांनी रिफायनरी होणार का या प्रश्नाला बगल देत काहीही बोलण्याचे टाळले.

रत्नागिरीतिल जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे त्याच बरोबर पोलिसांच्या निवासी इमारतींचे भूमी पूजन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आम. योगेश कदम, प्रमोद जठार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in