विहीरीत पडलेल्या बछड्याला वनविभागाने काढले बाहेर

वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी गमेवाडीत जावुन संबंधित विहिरीतुन बछड्याला बाहेर काढून सुरक्षीतस्थळी नेले आहे.
विहीरीत पडलेल्या बछड्याला वनविभागाने काढले बाहेर

कराड: कराड तालुक्यातील तांबवेजवळील गमेवाडीतील एक विहीरीत बिबट्याचा बछडा पडला होता. त्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी ती माहिती वनविभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी गमेवाडीत जावुन संबंधित विहिरीतुन बछड्याला बाहेर काढून सुरक्षीतस्थळी नेले आहे.

गमेवाडीतील उत्तम जाधव यांच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला होता. शनिवारी काळी संतोष शेडगे यांनी बिबट्याचा बछडा विहीरीत पडल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ उत्तम जाधव यांचे बंधू दादासाहेब जाधव यांना त्याची माहिती दिली. त्यांनी तातडीने वन सेवक मयूर जाधव, उत्तमराव जाधव व पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने त्याची माहिती कराड वनविभागाला दिली असता वनविभागाचे तुषार नवले, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक एस एम राठोड, वनरक्षक रसवी, वनसेवक शिबे, मयूर जाधव, प्राणिमित्र रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, गणेश काळे कराड मधील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित बछड्याला सुखरूप विहीरी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काहीवेळात त्यांनी सुरक्षीतरित्या छोट्या पिंजऱ्यातू न बाहेर काढून सुरक्षीतस्थळी बछड्याला हलवले आहे. सदर बछड्याचा योग्य संगोपन करून नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in