शिक्षक व पदवीधर मतदारसंघांची निवडणूक पुढे ढकलली

शाळांना १५ जूनपर्यंत सुट्टी असल्याने मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत शिक्षक संघटनांनी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : शाळांना १५ जूनपर्यंत सुट्टी असल्याने मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत शिक्षक संघटनांनी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली आहे. यामुळे शिक्षकांच्या मताचा अधिकार सुरक्षित राहणार आहे.

निवडणूक आयोगाने मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक जाहीर केली होती. या चार जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार होते. मात्र, राज्यातील शाळांना १५ जूनपर्यंत सुट्टी असल्याने अनेक शिक्षक परगावी गेले आहेत. त्यामुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती शिक्षक संघटनांनी केली होती. तर शिक्षक भरती संघटनेने न्यायालयात याबाबत आव्हान दिले होते. संघटनांच्या मागणीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली आहे.

logo
marathi.freepressjournal.in