जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार सीईटी परीक्षेचा निकाल

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.
संग्राहित छायाचित्र
संग्राहित छायाचित्र

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षांची उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिका विद्यार्थांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पीसीबी ग्रूपची सीईटी परीक्षा २२ ते ३० एप्रिल या कालीवधीत तर पीसीएम ग्रूपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याचे नियोजन सीईटी सेलने केले आहे.

या परीक्षेची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीवर प्रसिद्ध केली आहे. पीसीबी ग्रूपच्या विद्यार्थ्यांना २४ मेपर्यंत आक्षेप नोंदवता येईल. तर पीसीएम ग्रूपच्या विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत आक्षेप नोंदवता येईल.

६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दिली सीईटी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेतलेल्या सीईटी परीक्षेला ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थी बसले होते. यापैकी ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम गटाची परीक्षा दिली आहे. तर पीसीबी गटाची परीक्षा ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in