पैशांच्या जोरावर निवडून येणाऱ्या चारित्र्यहिनांना पाडणारच! पंकजा मुंडे यांचा निर्धार

यावेळी त्यांनी माझा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असेही म्हटले.
पैशांच्या जोरावर निवडून येणाऱ्या चारित्र्यहिनांना पाडणारच! पंकजा मुंडे यांचा निर्धार

मुंबई: जिंकून येण्यासाठी तुम्ही निष्ठा, नितीमत्ता गहाण टाकू शकत नाही. राजकारणात लोकांचे हित बघणे माझे कर्तव्य आहे. आता मी माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. राज्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचे प्रश्न आहेत. या सरकार आणि नेत्यांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे आता जनतेला अपेक्षाभंग सहन होणार नाही, असे सांगतानाच बदलत्या राजकारणाचा संदर्भ देत आता मी घरी बसणार नाही, तर मैदानात उतरणार आणि चारित्र्यहीन, पैशाच्या जोरावर निवडून येणाºयांना पाडणारच, अशा शब्दांत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी निर्धार बोलून दाखविला. यावेळी त्यांनी माझा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असेही म्हटले.

भगवान गडाच्या पायथ्याशी सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी भगवानगडावर प्रेम करणारे मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे नेमके काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत पक्षाला निष्ठा आणि नितीमत्तेचे सल्ले देतानाच जिंकून येण्यासाठी कुणी नितीमत्ता, निष्ठा गहाण टाकू शकत नाही, असे म्हटले. एवढेच नव्हे, तर २०२४ पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदानात उतरणार असल्याचे सांगत निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.

राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. आता राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षणासह अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा स्थितीत या सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. अशा स्थितीत अपेक्षाभंग आता जनता सहन करणार नाही, असे सांगतानाच ज्यांना पद, प्रतिष्ठा आणि मान मिळतो, त्यांचे भागते. दरवेळी तुम्ही आशा लावता आणि दरवेळी तुमचा अपेक्षाभंग होतो. पद न घेता निष्ठा काय असते, हे लोकांना विचारा. पण आता मी माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आपल्याला त्रास देणाºयांचे घर उन्हात बांधू. ज्या टिकाणी तुमचे भले, तिथे पंकजा मुंडे नतमस्तक होणार, असे सांगत त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला.

आता मी मैदानात उतरणार

मी पराभूत झाले, पण कधीच मनाने खचले नाही. तुमची सेवा करण्यात खंड पडला. माझ्या मदतीसाठी तुम्ही दोन दिवसांत ११ कोटी जमा केले. पण मी ते पैसे घेणार नाही, तुमचे आशीर्वाद घेणार, असे सांगत पंकजा मुंडे यांनी आता मी माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. त्यासाठी मी मैदानात उतरणार, असे म्हटले आणि आपली पुढील संघर्षाची दिशा स्पष्ट केली.

सरकारलाही इशारा

गोपीनाथ गड तीन महिन्यांत बनवला. पण आता तीन वर्षे झाली तरी सरकारकडून मुंडे साहेबांचे स्मारक बनलेले नाही. आता बनवूही नका. आता तर काही बनवायचे असेल तर शेतकऱ्यांचे कष्ट दूर करणारी जादूची कांडी बनवा आणि माझ्या ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावा, असे सांगत राज्य सरकारला एक प्रकारचा गर्भित इशारा दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in