मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फाडले बँनर, डांबर फासून केला राग वक्त; पोलीस प्रशासनाची वाढली चिंता....

आज यवतमाळ इथं 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमावर मराठा आंदोलनाच तीव्र सावट दिसत आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फाडले बँनर, डांबर फासून केला राग वक्त; पोलीस प्रशासनाची वाढली चिंता....

राज्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषण, प्रचार आणि मोर्चे सुरु आहेत. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी इथं आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असून अद्यापि सरकारनं काही ठोस निर्णय सांगितलं नाही आहे. आरक्षणासाठी आंदोलक जागोजागी प्रचार करत आहेत.

आज यवतमाळ इथं 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमावर मराठा आंदोलनाच तीव्र सावट दिसत आहे. या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फलक लावले असून त्या फलकांवर अज्ञातांनी डांबर फासल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी फलक देखील फाडण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकाराने पोलीस प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे.

यवतमाळ शहरालगत किन्ही या गावी 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच उल्लंघन करून संपूर्ण शहरात व आर्णी मार्गावर बॅनर लावले आहेत.

या बॅनरमुळे वाहतुकीस त्रास होत असताना देखील नगर परिषद प्रशाननानेही बॅनरबाजीला विरोध केला नाही. मात्र, पोलिसांची नजर चुकवून येथील आर्णी मार्गावरील बसस्थानक चौक, ओम कॉलनीचे प्रवेशद्वार आदी ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या फलकावरील छायाचित्रावर अज्ञातांनी डांबर फासले आहे.ही गोस्ट आज सकाळी उजेडात आल्यानंतर पोलिसांसह नगर परिषद प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली आहे. नगर परिषद प्रशासनाने हे फलक तत्काळ काढून घेतले आहेत. अनेक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलकावर संपूर्ण डांबर फासून अज्ञातांनी राग काढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in