मुख्यमंत्र्यांनी मोटारसायकल चालवून घेतला बाईक रॅलीत सहभाग; रामटेक मतदारसंघात राजू पारवे यांच्यासाठी प्रचार

विदर्भातील कडक उन्हाची पर्वा न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी रोड शो केला. या बाईक रॅलीला महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली.
मुख्यमंत्र्यांनी मोटारसायकल चालवून घेतला बाईक रॅलीत सहभाग; रामटेक मतदारसंघात राजू पारवे यांच्यासाठी प्रचार

उमरेड : रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. या प्रचार फेरीत मुख्यमंत्र्यांनी स्वत: मोटारसायकल चालवत राजू पारवेंच्या विजयासाठी मतदारांना साद घातली. याशिवाय त्यांनी मंगळवारी दोन प्रचारसभाही घेतल्या.

विदर्भातील कडक उन्हाची पर्वा न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी रोड शो केला. या बाईक रॅलीला महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली.

देशाला विकासाकडे नेण्यासाठी तुमचे एक-एक मत महत्त्वाचे आहे. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत, हे आपल्याला ठरवायचे आहे. येत्या १९ एप्रिल रोजी धनुष्यबाणाचे बटन दाबून राजू पारवे यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मतदारांना केले.

मोदीजींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकेड झेंडा आणि अजेंडा नाही तर ते कमिशन आणि करप्शन फर्स्टसाठी काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने ५० ते ६० वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी राजू पारवे यांना विजयी करा, असे आवाहन केले.

logo
marathi.freepressjournal.in