महाबळेश्वर जनरेटर स्फोटातील जखमींची प्रकृती स्थिर

दुर्घटनेतील जखमींपैकी पाच मुलांवर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

कराड : महाबळेश्वर येथील कोळी गल्लीतून दुर्गामाता विसर्जन मिरवणूक जात असताना या मिरवणुकीत आणलेल्या डीजे साऊंड सिस्टिमच्या जनरेटरचा स्फोट होवून या स्फोटात तीन ते सात वयोगटातील सात लहान मुले व दोन तरूण अशी एकूण नऊजण आगीत होरपळून गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेतील जखमींपैकी पाच मुलांवर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत,तर तिघांवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या अलिना सादिक नदाफ (वय ६),समर्थ सनी सपकाळ (वय ७),शिवांश संजय ओंबळे (वय ४),ओवी पवन पॉल (वय ४), संस्कृती सुनिल वाडकर (वय ४) या पाच लहान मुलांना पुण्यातील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर आराध्या प्रशांत भोसले (वय ४),साईशा अमित पवार (वय ४),आशितोष यशवंत मोहीते (वय १९) या तिघांवर सातारा येथील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आज या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून लवकरच ते बरे होऊन आपापल्या घरी परततील असा विश्वास व्यक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in